स्टार कॉर्पोरेट ट्रॅव्हल प्रोटेक्ट इन्शुरन्स पॉलिसी

*I hereby authorise Star Health Insurance to contact me. It will override my registry on the NCPR.

IRDAI UIN: IRDA/NL-HLT/SHAI/P-T/V.I/143/13-14

HIGHLIGHTS

Plan Essentials

essentials

कॉर्पोरेट प्रवास कव्हर

ही पॉलिसी तुमच्या प्रवासादरम्यान किंवा परदेशात राहताना णत्याही वैद्यकीय इर्मजन्सीमुळे आणि प्रवासातील गैरसोयींमुळे झालेल्या खर्चासाठी संरक्षण प्रदान करते.
essentials

वारंवार प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी

कॉर्पोरेट कर्मचार्‍यांसाठी डिझाइन केलेली विशेष पॉलिसी जी वारंवार  व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी आहे.
essentials

इन्श्युअर्ड रक्कम

ही पॉलिसी तीन इन्श्युअर्ड रकमेचे पर्याय प्रदान करते. ते USD 100,000, USD 250,000 आणि USD 500,000 आहेत.
essentials

इर्मजन्सी वैद्यकीय खर्च कव्हर

ही पॉलिसी विमाधारक व्यक्तीच्या परदेशात वास्तव्यादरम्यान वैद्यकीय इर्मजन्सीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई करते.
DETAILED LIST

काय समाविष्ट आहे ते समजून घ्या

महत्वाचे ठळक मुद्दे

इन्शुरन्सपूर्व वैद्यकीय तपासणी

या पॉलिसीसाठी इन्शुरन्सपूर्व वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही. तथापि, ज्यांचे  वय 65 वर्षांहून अधिक आहे आणि ज्यांचा वैद्यकीय इतिहास प्रतिकूल आहे त्यांनी ECG, जेवणापुर्वी आणि जेवणानंतरच्या रक्तातील साखरेची तपासणी, कोलेस्ट्रॉल प्रोफाइल आणि युरिन स्ट्रिप तपासणी प्लॅन अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

पॉलिसी घेण्याचे वय

6 महिने ते 70 वर्षे वयोगटातील भारतात राहणारी कोणतीही व्यक्ती  सुट्टीच्या दिवशी किंवा व्यवसायाच्या सहलीवर भारताबाहेर प्रवास करणारी व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेऊ शकते.

प्लॅन पर्याय

ही पॉलिसी USA आणि कॅनडासह जगभरातील प्रवासासाठी संरक्षण प्रदान करते.

ट्रिप बँड

ही पॉलिसी दोन ट्रिप बँड पर्यायांतर्गत कव्हर प्रदान करते - 30 दिवस आणि 45 दिवसांचा बँड.

इर्मजन्सी वैद्यकीय निर्वासन

ही पॉलिसी वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार विमाधारक व्यक्तीच्या इर्मजन्सी वैद्यकीय स्थलांतरासाठी संरक्षण प्रदान करते. यामध्ये संबंधित वाहतूक आणि वैद्यकीय उपचार खर्च देखील समाविष्ट करते.

ट्रिप विस्तारासाठी कव्हर

जर विमाधारक व्यक्ती पॉलिसीच्या शेवटच्या दिवशी भारताबाहेर प्रवास करत असेल, तर पॉलिसी आपोआप ट्रिप पूर्ण होईपर्यंत किंवा पॉलिसीच्या समाप्ती तारखेपासून 30 किंवा 45 दिवसांच्या आत विमाधारक व्यक्ती भारतात परत येईपर्यंत वाढेल.

डेंटल इर्मजन्सी कव्हर

ही पॉलिसी पॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत ट्रिप दरम्यान दुखापतीमुळे उद्भवलेल्या दातांच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी तीव्र ऍनेस्थेटिक उपचारांवर झालेल्या खर्चासाठी संरक्षण प्रदान करते.

प्रवासातील गैरसोयींसाठी कव्हर

या पॉलिसीमध्ये फ्लाइट विलंब, ट्रिप रद्द करणे, पासपोर्ट गमावणे, चेक-इन केलेले सामान गमावणे किंवा उशीर होणे, सुटलेली फ्लाइट/कनेक्शन आणि हायजॅकचा त्रास यांसारख्या प्रवासातील गैरसोयींमुळे होणारे नुकसान समाविष्ट आहे.

पासपोर्ट गमावणे

जर एखाद्या विमाधारक व्यक्तीने प्रवासादरम्यान त्याचा/तिचा पासपोर्ट गमावला, तर कंपनी नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी किंवा मायदेशी परतण्यासाठी वैध प्रवासी कागदपत्रे मिळवण्यासाठी झालेल्या खर्चाची पूर्तता करेल.

अपहरण त्रास

जर सामान्य वाहक ज्यामध्ये इन्शुरन्स घेतलेली व्यक्ती प्रवास करत असेल त्याचे अपहरण झाले असेल आणि ट्रिपमध्ये 12 तासांपेक्षा जास्त काळ व्यत्यय आला किंवा विस्कळीत झाली, तर कंपनी निर्दिष्ट मर्यादेनुसार विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी समतुल्य भारतीय रुपये देईल.

चेक-इन बॅगेजला विलंब

प्रवासादरम्यान विमाधारकाच्या चेक-इन बॅगेजला 12 तासांपेक्षा जास्त उशीर होत असल्यास, कंपनी पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंतच्या विलंबाची भरपाई देईल.

चेक-इन बॅगेजच्या नुकसानासाठी कव्हर

जर चेक-इन केलेले सामान (विमाधारक व्यक्तीची मालमत्ता) एअरलाइन किंवा वाहकाद्वारे हरवले, तर कंपनी पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत विमाधारक व्यक्तीकडून झालेल्या नुकसानाची भरपाई करेल.

फ्लाइट विलंब

इन्शुरन्स घेतलेल्या व्यक्तीच्या फ्लाइटला सहा तासांपेक्षा जास्त उशीर  झाल्यास, कंपनी निर्दिष्ट मर्यादेपर्यंत अतिरिक्त निवास, प्रवास आणि विशिष्ट मर्यादेपर्यंत इतर वाजवी खर्चासाठी झालेल्या खर्चाची भरपाई करेल.

ट्रिप रद्द करणे/व्यत्यय

विमाधारक व्यक्तीचा किंवा त्याच्या/तिच्या कुटुंबातील सदस्याचा अपघाती शारीरिक दुखापतीमुळे किंवा मृत्यूमुळे विमाधारकाची ट्रिप रद्द झाली, तर  कंपनी विमाधारकाला किंवा त्याच्या/तिच्या कायदेशीर प्रतिनिधींना निर्दिष्ट रकमेपर्यंत नुकसानभरपाई देईल.

सुटलेले प्रस्थान/कनेक्शन

विमाधारक व्यक्ती विनिर्दिष्ट कारणांमुळे आधी बुक केलेले डिपार्चर किंवा कनेक्शन फ्लाइट चुकवल्यास, कंपनी वाजवी अतिरिक्त निवास आणि प्रवासासाठी झालेल्या खर्चाची भरपाई करेल.

वैयक्तिक दायित्व कव्हर

इन्शुरन्स उतरवलेली व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला आजार/दुखापत (प्राणघातक किंवा गैर-घातक) किंवा इन्शुरन्स कालावधीत मालमत्तेचे नुकसान यासाठी कायदेशीररित्या जबाबदार असल्यास, इन्शुरन्स कंपनी विमाधारकास सर्व रकमेची नुकसानभरपाई देईल जी तो/ती कायदेशीररित्या भरण्यास जबाबदार असेल.

वैयक्तिक अपघात कव्हर

अपघातामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास, कंपनी  विमाधारक व्यक्तीला किंवा त्याच्या/तिच्या कायदेशीर प्रतिनिधींना निर्दिष्ट मर्यादेपर्यंत एकरकमी रक्कम देईल.

मर्त्य अवशेषांची वाहतूक

विमाधारक व्यक्तीचा परदेशात मृत्यू झाल्यास, ही पॉलिसी विमाधारक व्यक्तीच्या पार्थिव अवशेषांची वाहतूक कव्हर करते किंवा ज्या देशात मृत्यू  झाला त्या देशात स्थानिक दफन किंवा अंत्यसंस्कारासाठी समतुल्य रकमेची भरपाई करते.

बदली कर्मचाऱ्यासाठी कव्हर

विमाधारक कर्मचारी आजारी पडल्यास किंवा जखमी झाल्यास, ही पॉलिसी विमाधारक व्यक्तीच्या जागी एका पर्यायी कर्मचाऱ्याला पाठवताना झालेल्या कोणत्याही प्रवास खर्चासाठी संरक्षण प्रदान करते.

वजावट

ही पॉलिसी वजावटीच्या अधीन आहे. याचा अर्थ ती रक्कम ज्यापर्यंत कंपनी प्रत्येक दाव्यासाठी देय असणार नाही.
कृपया पॉलिसीचे डीटेल्स आणि टर्म्स आणि कंडीशन जाणून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्स पहा.
स्टार हेल्थ

स्टार हेल्थ इन्शुरन्स का निवडावा?

हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.

आमचे ग्राहक

स्टार हेल्थ सह ‘हॅपीली इन्शुअर!’

आम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी, तुमचे पैसे वाचवण्यासाठी आणि हेल्थ इन्शुरन्स नेव्हिगेट करणे कठीण बनवणाऱ्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी वचनबद्ध आहोत.

Customer Image
माझ्या मित्राने मला स्टार हेल्थ इन्शुरन्समधून हेल्थ इन्शुरन्स घेण्यास सांगितले. त्यामुळे माझ्या मुलाच्या आजारपणात मला मदत झाली. त्यांची कॅशलेस उपचार सुविधा त्यावेळी खूप उपयुक्त होती. मी त्यांच्या सेवा आणि सपोर्टची खरोखर प्रशंसा करतो.

तिजी के ओमन

तिरुवनंतपुरम

इन्शुअर्ड व्हा

वनश्री

बेंगळुरू

इन्शुअर्ड व्हा
Customer Image
मी गेल्या 8 वर्षांपासून स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये आहे आणि त्या काळात मी दोन क्लेमसाठी अर्ज केला आहे. दोन्ही क्लेम निकाली निघाले, आणि माझ्या हॉस्पिटलायझेशन दरम्यान मला कंपनीकडून चांगला सपोर्ट मिळाला.

रामचंद्रन

चेन्नई

इन्शुअर्ड व्हा
Customer Image
जेव्हा मला गरज होती तेव्हा स्टार हेल्थ इन्शुरन्सने मला खूप मदत केली. माझ्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान मला त्यांच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार प्रदान करणाऱ्या स्टारच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी अंतर्गत संरक्षण मिळाले.

शैला गणाचारी

मुंबई

इन्शुअर्ड व्हा
Customer Image
मी गेल्या 7-8 वर्षांपासून मेडिक्लेम सेवा वापरत आहे. मी इतर कंपन्यांचा इन्शुरन्स पाहिला होता. परंतु, स्टार हेल्थ इन्शुरन्सने मला दिलेल्या सेवेबद्दल मी समाधानी आहे, त्यांच्याकडे मैत्रीपूर्ण सपोर्ट कर्मचारी देखील आहेत.

सुधीर भाईजी

मुंबई

इन्शुअर्ड व्हा
user

दुसरे काहीतरी शोधत आहात?

सुरु करूया

सर्वोत्तम बद्दल खात्री बाळगा

तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.

Contact Us
अधिक माहिती हवी आहे?